shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ टेक्निकल कॅम्पस कडून अपंग कल्याण केंद्रास जीवनावश्यक वस्तूंची भेट


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २७ /   साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ टेक्निकल कॅम्पस ,चास,अहमदनगरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नेप्ती येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज अपंग कल्याण केंद्राला जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली.

आडसूळ टेक्निकल कॅम्पस चे प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध आडसूळ, उपाध्यक्ष विश्वनाथ आडसूळ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी सढळ हाताने मदत करत विशेष सहभाग नोंदवला.

ज्या समाजात आपण जगत असतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गरजूंना मदत करण्याचे संस्कार विद्यार्थ्यावर व्हायला पाहिजेत हा उदात्त्य  हेतू ठेवून अपंग केंद्रास मदत करण्याचा उपक्रम राबवण्यात आला . तसेच दैनंदिन जीवनात आपण कितीतरी अनावश्यक खर्च करत असतो त्यापैकी काही खर्च अशा प्रकारच्या केंद्रासाठी  राखून ठेवून त्यांना मदत करण्याचा संकल्प केला पाहिजे असे मत प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. अपंग कल्याण केंद्राचे संचालक बारवकर के. पी. यांनी आडसूळ टेक्निकल कॅम्पस ने दिलेल्या तेलाचे डबे, गव्हाचे पोते, बाजरी कट्टा, रवा कट्टा, बेसन पीठ, मिरची पावडर, कांदे, लसूण, तांदुळ पोते, साखर, हरभरा, चवळी, राजमा, साबुदाणा, वाटाणा, मटकी, चणाडाळ, अख्खा मसूर, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, अंघोळीचे साबण आणि खोबरेल तेल इत्यादी भेट दिलेल्या वस्तू आम्हाला दोन ते तीन महिने पुरतील असे सांगून संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले.

याप्रसंगी अपंग कल्याण केंद्राच्या बारवकर के. पी.  व कर्मचारी झावरे यु. आर., मोमीन पी. आर., साळवे व्ही. एम., वारकड ए. एम. तर आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे विद्यार्थी आणि उप प्राचार्य  किशोर जाधव, संगणक विभाग प्रमुख डॉ.हेमंत जाधव, एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.विश्वजित कांबळे , इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. संकेत शिंदे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. गणेश शिरसाठ, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. पूजा साठे,डॉ.धन्यकुमार जैन, प्रा. सचिन भोंडवे , प्रा. स्नेहलता पुराणिक, प्रा. जवरे ए.आर  आदी उपस्थित होते.
close