बड्या नेत्याचा आशीर्वाद असलेल्या मुजोर ठेकेदारांवर पालिका प्रशासनाची कारवाई करण्यास टाळा-टाळ : नागरीक संतप्त
श्रीरामपूर । प्रतिनिधी :
श्रीरामपूर नगर पालीके अंतर्गत शहरात झालेल्या विविध रस्ते विकास कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन नगर पालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारास पाठीशी घातले जात असल्याचे दिसून येत आहे.या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन उचित कार्यवाही करावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी पासून येथील नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत असून उपोषणाचा आज तीसरा दिवस आहे.
सविस्तर असे की, श्रीरामपूर शहरातील पंजाबी कॉलनी येथील रस्ता, सिंधी कॉलनी येथील झालेला रस्ता,कोर्टाच्या शेजारील व पाठीमागे बाजूस झालेला रस्ता,रासकर नगर येथील झालेला रस्ता, कचेरीच्या पाठीमागे अचानकनगरकडे जाणारा झालेला रस्ता, नगरपरिषद शेजारील सिमेंटच्या रस्त्याची झालेली देखभाल दुरुस्ती या सर्व रस्त्याच्या निकृष्ट थातुरमातुर नियमबाह्य झालेल्या कामांची सदरील रस्त्यांसाठी वापरण्यात आलेली निकृष्ट मटेरियल डांबर यांची गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून संबंधीत ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या बांधकाम इंजिनिअरवर कारवाई करावी अशी भारतीय लहुजी सेनेची मागणी असून आज उपोषणाच्या तीसऱ्या दिवसापर्यंत उपोषण चालू असून श्रीरामपूर न.पा.प्रशासनाकडून आद्यप कोतीही कार्यवाही, झालेली नाही. याकरीता भारतीय लहुजी सेना आता पुढील आक्रमक भुमिकेच्या तयारीत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
तसेच अ.भा.लहुजी सेनेच्यावतीने देण्यात आलेल्या उपोषण निवेदनात संबंधित रस्ते विकास कामांसाठी वापरण्यात आलेली खडी ही पांढरी स्पॉट असलेली निकृष्ट प्रतीची वापरलेली खडी आहे .तसेच कोर्टाशेजारील रस्त्यासाठी बाजूचा मुरूम,माती खांदून त्याचा भराव केलेला आहे. रस्त्याच्या बाजूला खड्डा केलेले आहे.मोठ्या प्रमाणात तसेच सदर ची खडी ही शासकीय मान्यता प्राप्त खाणीतील घनाकार कोनेदार अंदाज पत्रकात नमूद केल्याप्रमाणे कामे झालेली नाही. सदरील सर्व कामे ही ठेकेदाराने ठेकेदाराने अंदाज पत्रकात नमूद केल्याप्रमाणे न करता करारनामातील अटी व शर्ती चे उल्लंघन केले आहे. कारण या ठेकेदाराला एका मोठ्या मंत्र्याचा वरदहस्त असल्याकारणाने तो कोणाला घाबरत नाही असेही बोलले जात आहे, त्यामुळे तो पालिकेतील इंजिनियर मुख्याधिकारी यांना जुमानात नाही त्याचं कोणीही काही करू शकत नाही अशा अविर्भावात तो ठेकेदार बिनधास्त फिरत आहे, व थातूर- मातूर निकृष्ट बोगस कामे करून शासनाचा लाखो नव्हेतर कोट्यावधी रुपयाच्या निधीची बोगस आणीहअल्प आयुशी कामे करून शासनाचा निधी संगनमताने टक्केवारी देऊन फस्त करत आहे असा आरोप उपोषणार्थी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,हनिफभाई पठाण,राजेंद्र त्रिभुवन,रज्जाकभाई शेख,रईस शेख आदिंनी केला आहे.
सदर रस्ते कामात डांबर नसल्यास जमा आहे व पावर रोलिंग चा वापर करून काम करण्यात आलेले नाही, रस्ते व्हाईट स्पॉटेड वापरलेली खडी अल्प भेसळयुक्त डांबर नियमबाह्य झालेली कामे करारनाम्याप्रमाणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधी अंतर्गत गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये झालेले काही प्रमाणात झालेल्या निकृष्ट रस्त्याची व त्या रस्त्यासाठी वापरण्यात आलेली निकृष्ट खडी वाईट स्पॉटेड खडी अल्प प्रमाणात डांबर नियमबाह्य करारनाम्याप्रमाणे किंवा अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता थातुरमातुर बोगस कामाची व कामाच्या गुणवत्ता मटेरियलची सखोल चौकशी होऊन इंजिनिअर व संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने आज रोजी दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी उपोषणाच्या तीसरा दिवस आहे, तीसरा दिवस उजडला तरी संबंधित मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद गणेश शिंदे हे उपोषण स्थळी भेट देण्यासाठी जाणून-बुजून आले नाही व त्यांनी संबंधित ठेकेदारावर अर्जात नमूद संबंधित कामाबाबत संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे उपोषणार्थी व कार्यकर्ते संतप्त झाले आहे तसेच सदरील उपोषणासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, मानवाधिकारचे प्रवीण फरगडे, भीमगर्जना सामाजिक संघटनेचे फिरोजभाई पठाण, मानवाधिकार संघाचे विठ्ठल गोराणे, समाजवादीचे -जोएफ जमादार, पत्रकार राजेश बोरुडे, जगधने सर,राज प्रसारित चे संपादक राजू मिर्झा,अमित कुसुमकर आदींनी पाठिंबा दर्शवून पालिका प्रशासनाबाबत मोठी नाराजगी आणि चीड उपोषण स्थळी व्यक्त केली आहे .तथा शहरातील नागरीकही संतप्त होताना दिसून येत आहेत.

