शिर्डी । प्रतिनिधी :- कॅन्सर सारख्या आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी येणाऱ्या खर्चामुळे मोठा प्रश्न रुग्न विशाल वाकचौरे यांच्या पुढे निर्माण झाला असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्या कुटुंबाच्या पाठीशी राहण्यासाठी शिर्डी शहरातील चावडी कट्ट्याने रुग्ण विशाल सोमनाथ वाकचौरे यांना २५ हजार रुपयाची मदत करून सामाजिक दायित्व दाखवून दिले आहे.
यावेळी कायम सामाजिक कामात पुढाकार घेणारे शिर्डी येथील चावडी कट्ट्याचे सहकारी सर्जेराव कोते ज्ञानेश्वर गोंदकर प्रमोद गोंदकर भाऊसाहेब भोसले विलास आबा कोते मच्छिंद्र शेळके तानाजी गोंदकर दत्तात्रय गोंदकर दिलीप कोते दीपक वारुळे सचिन तांबे वकील विलास असणे नारायण थोरात केशव गोंदकर विजय थोरात राजेंद्र गोंदकर दादासाहेब काळे भास्कर जगताप बापूसाहेब ठाकरे आदीसह विविध मान्यवरांच्या उपस्थित विशाल वाकचौरे यांना २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सर्जेराव कोते म्हणाले की आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून यथाशक्ती योग्य ती आर्थिक मदत रुग्णांना दिलेली आहे त्यामुळे अनेकांना जीवनदान देखील मिळालेले आहे या कामातून मिळणारे समाधान मोठे असल्याचे यावेळी कोते यांनी सांगितले.

