प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज येथील शारदा इंग्लिश स्कूल ची विद्यार्थीनी जागृती अमरजीत तिवारी व समृद्धी काळे हिने रायफल शूटिंग 14 वर्ष वयोगट स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय पातळीवरील रायफल शूटिंग 14 वर्ष वयोगटातील स्पर्धेत शारदा इंग्लिश स्कूल केज ची धारूर येथील विद्यार्थिनी जागृती अमरजीत तिवारी व केज येथील समृद्धी काळे हिने जिल्हास्तरा वर प्रथम व औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय स्तरावर ही प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धे साठी तिची निवड झाली आहे तिला शाळेच्या क्रीडा शिक्षक, व इतर शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तालुक्यातील राज्यस्तरावर जाणारी धारूर येथील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख रमेशराव आडसकर, अर्चनाताई आडसकर शाळेचे प्राचार्य मिश्रा एस एम, पी एम देशमुख, क्रिडा शिक्षिका वर्षा दिक्कत, क्रिडा शिक्षक सोळंके सर, व केज, धारूर येथील अनेकांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

