उद्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार इंदापूर दौऱ्यावर.
बोरी व कळस गावात आधुनिक द्राक्ष शेती व आधुनिक ऊस शेतीची करणार पाहणी.
इंदापूर प्रतिनिधी: नववर्षाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार इंदापूर तालुक्यात सकाळी ठिक ९:०० वाजता मौजे बोरी येथे "आधुनिक द्राक्ष शेतीची पाहणी" तसेच सकाळी ठिक १०:१५ वाजता मौजे कळस येथे "आधुनिक ऊस शेतीची पाहणी" करणार आहेत. याप्रसंगी माजी राज्यमंत्री तथा तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर ,पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी माहिती दिली.

