shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशस्वीतेचा मार्ग..!



खरोखर अवघं जग बसलयं तुझ्या प्रतिक्षेत,
तू प्रगतीच्या प्रवाहात पाऊल उचलतर खरं !

दे झुगारुन नको त्या सर्व अनावश्यकबाबींना,
स्वतःला चार - चौघात घेऊन बसवतर खरं !!

जगभराचं सामर्थ्य ओसांडून वाहतयं तुझ्यात,
तरी तू  का बरं उदास होवून बसला आहेस ?

मान,सन्मान,धनसंपदा, ऐश्वर्य चालून घरी 
यावं तुझ्या, का याकरिता रुसला आहेस ?

तुला तुझं लक्ष नक्कीच साध्य करता येईल रे 
मात्र शेवटी कुठंवर तू असा उभाच राहतोस ?

निर्माण कर स्वतःत एक नवी उमेद नवी उर्जा,
जीवीत असूनही का रे तु मडं होवू पाहतोस ?

 तुझं आयुष्य सुधरविण्यासाठी, दुसरं कोणीही येणार नाही, इथं सर्वांनाच आपापले पडले आहे !

तुझा उद्धार तुझ्याच हाती, तू  फक्त वाटसरु हो, 
तुझ्या वाटेतच तुझे प्रगतीचे यश दडले आहे !!

तू आपल्या ह्रदयात समतेला भर, सोबतच 
थोडसं सदभाव, स्नेह, प्रेम आणि ममतेला भर !

तुला अंतःकरणाने सांगतोय शौकत,कमीतकमी 
त्याच्या बोलण्यावर जरासा भरवसा तर कर !!

जरासा भरवसा तर कर ! भरवसा तर कर !!

शब्दालंकार : शौकतभाई शेख
श्रीरामपूर - मोबा: ९५६११७४१११
close