shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*

*शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
(पुणे, दि.१५): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेकरीता शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

  या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत शाळांनी ऑनलाईन शाळेची माहिती व आवेदनपत्र भरलेले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र व नियमित शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत २० डिसेंबर, विलंब शुल्क २१ ते २५ डिसेंबर, अतिविलंब शुल्क भरण्याची मुदत २६  ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती व आवेदनपत्र विहीत मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.
close