उच्चशिक्षित रूपालीताई मुंडेंना मतदार देणार मतदानरूपी आशिर्वाद..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
देवगाव ग्रामपंचायतीमध्ये रेणूकामाता ग्रामविकास पॅनल देवगावच्या विकासाचा दृष्टीकोण समोर ठेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरला आसून सरपंच पदाच्या उच्चशिक्षित उमेदवार सौ.रूपालीताई अतुल मुंडे यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे देवगाव ग्रामपंचायतीमध्ये सौ.रूपालीताई अतुल मुंडे यांची "शिट्टी" वाजनार हे निश्चित मानले जात आहे.
केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्यात आला आसून देवगावच्या विकासाचा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन रेणूकामाता ग्रामविकास पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उतरला आहे.उच्चशिक्षित व गावच्या विकाससाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या सौ.रूपाली अतुल मुंडे सरपंच पदाच्या उमेदवार आसून त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे मतदारांच्या मतदानरूपी आशिर्वादाने रेणूकामाता ग्रामविकास पॅनलची "शिट्टी" वाजनार हे निश्चित आहे.
तसेच या निवडणूकीत वार्ड क्र.१ मधून अंकुश रामराव मुंडे (शिवणयंत्र) अश्विनी रायचंद नागरगोजे (बॅट) महानंदा प्रेमचंद मुंडे (फुटबाॅल) वार्ड क्र.२ राधाकिसन अभिमान मुंडे (फुटबाॅल) चंद्रकला राजेंद्र दराडे (बॅट) मंदाकीनी हरिदास मुरकूटे (शिवणयंत्र) वार्ड क्र.३ मधून राजेंद्र रामा कांबळे (शिवणयंत्र) रत्नमाला मच्छिंद्र मुंडे (फटबाॅल) मीरा शरद मुंडे (बॅट) आदी उमेदवार निवडणूक लढवत आसून वरिल सर्व चिन्हासमोरील बटण दाबून सर्वांना विजयी करण्याचे आवाहन विक्रम बप्पा मुंडे, विजयकांत मुंडे व अतुल मुंडे यांनी केले आहे.

