shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात जागतिक एड्सदिन जनजागृती रॅलीचे आयोजन!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज शहरात आज जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग केज व रोटरी क्लब ऑफ केज यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक ते केज तहसील कार्यालय अशा मार्गावर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. 





विद्यार्थी व नागरीकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. या रॅलीचा शुभारंभ केज उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय राऊत, गटविकास अधिकारी राजेश मोराळे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे,  पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकुमार नेहरकर यांच्या उपस्थितीत सुरू झाली. या रॅलीमध्ये सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय व वसंत कनिष्ठ महाविद्यालयाचे मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीचा समारोप केज  तहसील कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. 


यावेळी डॉ संजय राऊत व हनुमंत भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयसिटीसी च्या समुपदेशक शोभा साकसमुद्रे, केज रक्तपेढीचे वैज्ञानिक तंत्रज्ञ श्री नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ती गौरी शिंदे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ फारोकी मॅडम, ग्रामीण रुग्णालय नांदूरघाटचे  समुपदेशक सुनील गायकवाड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल गालफाडे, महालॅब चे सलमान इनामदार आणि बनसारोळा येथील ग्रामीण विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व केज रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी  विशेष परिश्रम घेतले.

close