shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेड तहसील कार्यालयावर गायरान जमिनीवर बांधलेली घरे कायम करण्यासाठी बाधित कुटुंबीयांच्या वतीने भव्य मोर्चा....मोर्चाला अभुतपूर्व प्रतिसाद..!

मोर्चाचे आयोजन: अखिल भारतीय किसान सभा, शिवशंभो छावाप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, खेड तालुका आम आदमी शेतकरी संघटना, गायरान अतिक्रमित घरे बचाव कृती समिती, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

*मोर्चामध्ये बाधित कुटुंबातील, महिला, तरुण व सामान्य व्यक्तीचा मोठासहभाग होता.

*नायब तहसीलदारांनी स्वीकारलेली निवेदन.

*त्वरित निर्णय झाला नाही तर न्यायालयीन पातळीवर, व रस्त्यावरील लढ्याची/आत्मक्लेस आंदोलना करण्याचा दिला इशारा.

खेड:-  खेड तालुक्यातील गायरान जमिनीवर अतिक्रमित करून बांधलेल्या कुटुंबीयांची ५0 ते ६0 गावांन मिळून२८९२ एवढी मोठी संख्या आहे. प्रशासकीय पातळीवरून अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस प्राप्त होत आहेत. त्यामुळे बाधित कुटुंबियांमध्ये भितीचे/असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

       गायरान अतिक्रमित बहुतेक कुटुंब गरीब, श्रमजीवी, मजूर,आदिवासी, दलित,विविध जाती, धर्मातील, असून त्यांनी आपल्या अल्पशा उत्पन्नातून आयुष्याची कमाई घरे बांधण्यासाठी गुंतवलेली आहे. यातील बहुतेक कुटुंबे  २५-३० वर्षापासून अधिक कालावधी पासून निवासी वास्तव्यातस आहेत. अनेकांच्या घरांच्या नोंदी देखील झालेल्या असून नियमित घरपट्टी सुद्धा भरत आहेत. असे असतानाही नोटीसा प्राप्त झाल्यामुळे भयभीत झालेल्या बाधित कुटुंबीयांनी बिगर राजकीय"एकत्रित लढा"  देण्याचे ठरवून  बुधवार दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:००वाजता राजगुरुनगर शहरातील एसटी स्टँड शेजारी हुतात्मा राजगुरूच्या पुतळ्यापासून ते तहसीदार कचेरीवर आपल्या न्याय हक्कासाठीभव्य मोर्चा काढला. या मोर्चाला भव्य प्रतिसाद लाभला असून मोर्चातील सहभागींच्या प्रतिसादाने तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधले.
     मोर्चाची सुरुवात एसटी स्टँड समोरील क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, यांच्या पुतळ्यास  बाधित कुटुंबातील महिला प्रतिनिधींच्या हस्ते हार घालून, घोषणा देऊन करण्यात आली.
      मोर्चात सहभागी बाधित व्यक्तींनी मोर्चा दणाणून सोडला..
* गायरान निवासी बांधवांची घरे कायम झालीच पाहिजे !झालीच पाहिजे!
* शासनाचे वतीने न्यायालयात पुनर-याचिका दाखल करा! दाखल करा!
*शासनाच्या देण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या नोटिसा रद्द करा! रद्द करा!
*घरी आमच्या हक्काची! नाही कुणाच्या बापाची!
*आमच्या मागण्या मान्य करा! नाहीतर खुर्च्या खाली करा!
*कोण म्हणतं देत नाही! घेतल्याशिवाय राहत नाही!
     अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला होता.
        खेड तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावातील बाधित शेतकरी (कुटुंबे) प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

     तहसील कचेरीवर समोर मोर्चा गेल्यानंतर मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवरांनी आपली मनोगते मांडून तीव्र भावना व्यक्त केल्या.
        नायक  तहसीलदार मा. संजय शिंदे सो.यांनी गेटवर येऊन मोर्चेकरांच्या समक्ष निवेदन स्वीकारले.  आपल्या मागण्या शासकीय पातळीवर पोहोचवण्यात येतील व सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले.
       आजच्या शांततामय मार्गाने झालेल्या मोर्चाला व निवेदनाला वेळीच योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात  तीव्र असे रस्त्यावरचे/आत्मक्लेषाचे आंदोलन करण्यात येईल असे असा इशाराही देण्यात आला. 

     निवेदनात गायरान अतिक्रमित निवासी बांधवांचे घरी कायम त्वरित करण्यात यावी, देण्यात आलेल्या नोटिसा त्वरित स्थगित करा, शासनाच्या वतीने न्यायालयात पुनर याचिका दाखल करावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
      मोर्चाचे नियोजन /संयोजन अखिलभारतीय किसान सभेचे खेड तालुकाध्यक्ष मा.किसनराव ठाकूर, सचिव,आमोद गरुड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंगाडे, राजू घोडे,निलेश भुजबळ,
    कृती समिती अध्यक्ष, विवेक भुजबळ ,शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, भरत पवळे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. दत्तभाऊ टाकळकर, महाराष्ट्र सरचिटणीस, संजय दाते , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन राक्षे, शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब येवले, सचिव, मनोहर गोरगल्ले,आम आदमी शेतकरी खेड तालुका समन्वयक, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे व बाधित कुटुंबीय प्रतिनिधी यांनी केले.
close