shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेहाना मुजावर शेख राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :  दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा लोककलावंत पै.मजनूभाई शेख शिक्षक रत्न गौरव पुरस्कार २०२२ या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच श्रीमती. रेहाना मुजावर शेख यांना सन्मानित करण्यात आले. 

दोस्ती फाउंडेशन अहमदनगर या संस्थेच्यावतीने लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.या वर्षीचा  पुरस्कारांचे वितरण सोहळा नुकतेच श्रीरामपूर येथील व्ही आय पी रेस्ट हाऊस येथे पार पडला.

या सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, सिनेअभिनेत्री वसुंधरा शर्मा, प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, कविवर्य सुभाष सोनवणे आदि मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील जि. प.प्राथमिक शाळा कान्हेगांव येथील शिक्षिका श्रीमती. रेहाना मुजावर शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .श्रीमती. रेहाना मुजावर शेख या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नेहमी विविध नवोपक्रम,राज्यस्तरीय नवोदय शिष्यवृत्ती,प्रज्ञाशोध परीक्षे संदर्भात मार्गदर्शन, कोरोना काळातील शिक्षण, वृक्षसंवर्धन, लोकसहभागातून पहिली दप्तरमुक्त शाळा, महिला मेळाव्यातून आरोग्य जागृती,स्त्री जन्माचे स्वागत तसेच  लोकसहभागातून शाळेचा विकास व विविध सामाजिक विषयावर प्रबोधन अशा या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

सदरील शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती. रेहाना मुजावर शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती. साईलता सामलेटी,केंद्रप्रमुख संतोष जमदाडे, सर्व शिक्षक बंधू- भगिनींनी व ग्रामस्थांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. श्रीमती. रेहाना मुजावर शेख यांना यापूर्वीही त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
close