shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे शरद कृषी महोत्स२०२२ भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ संपन्न

इंदापूर येथे शरद कृषी महोत्स२०२२ भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ संपन्न.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन समारंभ.

युवा महोत्सवास राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार राहणार उपस्थित.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख  मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये  गुरुवार (ता.८) रोजी शरद कृषी महोत्स भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह माजी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, शिवाजी तरंगे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब करगळ, बाळासाहेब काळे, सतीश पांढरे,तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, श्रीधर बाब्रस, अण्णासाहेब धोत्रे, संजय देवकर ,संदेश देवकर ,विठ्ठल ननवरे ,सचिन शिरसट ,संजय दरदरे,तोरस्कर गुरुजी, जावळे, रेहनाताई मुलानी ,सागर पवार,सुहास कारंडे-पाटील व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . 
हे प्रदर्शन १२ तारखेपर्यंत चालणार असून या काळात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
     इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ' शरद कृषी महोत्सव 2022' इंदापूर शहरातील नवीन तहसील कचेरी शेजारील प्रांगणात आज पासून सुरुवात झाली.यामध्ये शेतकरी,महिला, युवक यांच्यासाठी महोत्सव वरदान ठरणारा असणार आहे. या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात तब्बल २०० प्रकारचे विविध स्टॉल्स असून महाराष्ट्रातील नामांकित कृषी कंपन्या सहभागी झाले आहेत.विविध पिकाच्या वाढीसाठी, परिसंवाद व चर्चासत्राचे शेतकरी मेळाव्यामध्ये होणार आहे.यामध्ये नामांकित वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

    चौकट:

 युवा महोत्सवास अजित पवार राहणार उपस्थित.

शनिवारी दुपारी २ वाजता युवा महोत्सवास राज्याची विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितले.
close