shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेंगलोर, कर्नाटकला होणाऱ्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेसाठी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या खेळाडूंची निवड



प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ९ /  नुकत्याच पुणे येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने १३ व १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान राज्यस्तरीय स्केटिंग  रोलर हॉकी व इनलाईन हॉकीची निवड चाचणी व राष्ट्रीय स्पर्धापुर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर स्पर्धेत भूषणनगर केडगाव येथील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पुणे  येथे झालेल्या निवड चाचणीत महाराष्ट्रातील निवडक २५० ते ३०० उत्कृष्ट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू  सहभागी झाले होते. सदर निवड चाचणीत आपल्या दमदार खेळाच्या जोरावर  *स्केटिंग रोलर हॉकी* प्रकारात *११ वर्ष मुले* - पार्थ सतिष गायकवाड 
स्केटिंग ईनलाईन हॉकी प्रकारात १४ वर्ष मुले मुरारी गौरीशंकर जोशी  १७ वर्ष मुले साहिल संदिप कोळगे यांची निवड दि . ११ ते २२ डिसेंबर २०२२ दरम्यान बेंगलोर, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. .

यापुर्वी मोहाली, पंजाब व विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश. येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंची निवड झाली होती व खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचा ठसा उमटवला होता. 

   सदर निवड झालेल्या राष्ट्रीय खेळाडूंचे विद्यालयाच्या  व्यवस्थापिका सिस्टर पवित्रा, मुख्याध्यापिका सिस्टर डेल्ला, उप-मुख्याध्यापिका सिस्टर शेरोन, सिस्टर क्लेरा ॲंटो यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच सर्व विजेत्या खेळाडूंना    शाळेचे क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू  ‍श्री. सतिश गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
close