हल्लेखोरांचा बंदोबस्त करा अन्यथा ...
गृहमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार - भाऊसाहेब शिंदे
प्रतिनिधी : संजय वायकर
गुंडेगाव : 7 / नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी गुंडेगावातील अवैध धंदे (दारू ) बंद केल्याच्या रागातून गुंडेगावात त्यांच्यावर 24 नोव्हेंबर रोजी आरोपी दिपक भरत माने याच्या सह अनोळखी तीन इसमाने शिंदे यांच्यावर खुनी हल्ला करून जमखी केले होते .
त्यानंतर पोलीस यांनी तात्काळ आरोपी दिपक भरत माने याच्या सह तीन आरोपी वर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 कलमानुसार 324,323 504,506 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या नंतर आठ दिवसात पुन्हा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे गावात जात असतानाच तिथे दारू पिऊन आलेला आरोपी सर्जेराव कोतकर यानी तू दारू बंद का केली आम्हाला दारू पिण्यासाठी बाहेर जावे लागते तुझ्यामुळे आम्हला दारू भेटत नाही म्हणत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांना शिविगाळ ,जीवे मारण्याची धमकी देऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी गावातील लोक मधी आल्याने भाऊसाहेब शिंदे वाचले त्याच वेळी गुंडेगावातील दारू बंद असून विनोद नाईक यानी गावातील मंदिरात दारू पिऊन शिवीगाळ केली . या नंतर भाऊसाहेब शिंदे यानी पोलीस अधीक्षक राकेश ओला याची भेट घेतली .भेटीनंतर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरोधात कलम 504,506 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे . भाऊसाहेब शिंदे यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी प्रशासनास आत्मदहाना चा इशारा दिल्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास देऊन तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या नंतर गुंडेगावातील दारू बंद झाली होती. वारंवार होणारे हल्ले थांबावेत म्हणून एस.पी ओला यांना भाऊसाहेब शिंदे यानी निवेदन दिले असून हल्ले करणाऱ्या चा आठ दिवसात कायमस्वरूपी बंदोबस्त करा नाहीतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई मधील निवास स्थानी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे .

