ग्रामपंचायत कार्यालय वडापुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.
इंदापूर प्रतिनिधी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन ग्रामपंचायत वडापुरी येथे करण्यात आले.
यावेळी दादा बागल, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आनंद चंदनशिवे, अमोल पवार , तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, संजय खामगळ,माजी सरपंच महेंद्र काळे, प्रकाश करगळ, विक्रम चंदनशिवे, भारत चंदनशिवे, दयानंद चंदनशिवे, बाबुराव चंदनशिवे, गुलाब चंदनशिवे, धनंजय चंदनशिवे, तुषार चंदनशिवे, विलास चंदनशिवे ,कविता चंदनशिवे, आयशा सय्यद आशा स्वयंसेविका, प्रेमनाथ महादेव पवार ,संदीप रामचंद्र माने दिव्यांग प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे यांनी केले.

