पळसदेव येथील ग्रामपंचायतीच्या मुख्य इमारतीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्राम सचिवालय व ग्रामपंचायत कार्यालय पळसदेव हे नाव विद्युत रोषनाईमधून दिसत आहे उठून.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या दहा लाख रूपयातून ग्रापंचायतीचा पूर्णतः कायापालट -
मेघराज पाटील- कुचेकर.
इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव ग्रामपंचायतीच्या सुशोभीकरणासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री व तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या दहा लाख रूपयातून ग्रापंचायतीचा पूर्णतः कायापालट केला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मुख्य इमारतीला श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्राम सचिवालय, ग्रामपंचायत कार्यालय पळसदेव हे नाव विद्युत रोषनाईमधून टाकल्याने पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांचे पळसदेव व परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे. पळसदेव ग्रामपंचायतीच्या नामकरणासाठी झालेल्या ग्रामसभेमध्ये पळसदेवचे मेघराज पाटील- कुचेकर यानी ग्रापंचायतीच्या मुख्य इमारतीस श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसचिवालय व ग्रामपंचायतीच्या मुख्य सभागृहास श्री. शाहू फुले आंबेडकर, आहील्यांबाई होळकर सभागृह असे नामकरण करण्याची ग्रामसभेमध्ये मागणी - प्रस्ताव मांडला त्या विषयाला ग्रामसभेने सर्वानुमते ठराव मंजूर केला व पळसदेव मधील नागरिक मेघराज पाटील - कुचेकर यांच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.
तसेच नामकरणाचे लवकरच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री.उदयनराजे भोसले यांची वेळ - तारीख घेण्यासाठी पाठपुरावा चालू असून लवकरच त्यांच्या हस्ते नामकरणाचे उद्घाटन करण्यात येईल
तसेच पळसदेव गावातील बंदिस्त गटार योजना सभामंडप व इतर सुशोभीकरणासाठी माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे व माजी सभापती प्रविण मानें यांच्या माध्यमातून २०कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे पळसदेवचे मेघराज पाटील - कुचेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

