पेशाने डॉक्टर असूनही उद्योग क्षेत्रात भरारी घेणारा एक अवलिया म्हणजे डॉक्टर मनोज काळे होय.
सुर्ली गावचे सुपुत्र डॉ. मनोज दत्तात्रय काळे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: माढा तालुक्यातील सुर्ली गावचे आदर्श व्यक्तिमत्व व सर्वांचे असलेले आधारस्तंभ दत्तात्रय सिताराम काळे व आदर्श शिक्षिका कस्तुर काळे या शिक्षक दानपत्यांचा सुपुत्र मनोज काळे यांचा ४४ वा अभिष्टचिंतन दिन साजरा होत असताना त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा विचार करता त्यांनी आई-वडिलांच्या संस्काराची विचारांची जपणूक करत त्यांनी आपल्या आयुष्यात जे बदल घडवले त्यातून जीवनमान उंचावले म्हणून आजच्या युगातील तरुणांना एक प्रेरणादायी यशोगाथा नक्कीच उपयोगी ठरणारी आहे .
डॉ. मनोज काळे यांचा जन्म सुर्ली या गावी झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे या गावात झाले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण वालचंदनगर या ठिकाणी झाले. तसेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये बी. एच. एम. एस . ही डिग्री पुणे या ठिकाणी प्राप्त केली.
त्यानंतर त्यांनी ओंकार क्लिनिक या नावाने दवाखाना सुरू करत त्यांनी कंदर गावातील व सर्व परिसरातील रुग्णांची चार वर्षे सेवा केली. पुढे त्यांनी दूध व्यवसाय क्षेत्रामध्ये सहभाग घेतला व दूध संकलन करीत आपल्या व्यवसायामध्ये ठसा उमटवला. या संपर्काचा उपयोग करत पुढे त्यांनी कै. दत्तात्रय काळे सहकारी पतसंस्था उभारली व त्यांनी कंदर परिसरातील शेतकरी व व्यावसायिकांचे आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केला. त्यांच्या व्यवसायाची कसरत व जिद्द चिकाटी या जोरावर त्यांनी मोरया वीट भट्टीचा व्यवसाय चालू केला. त्यानंतर टेंभुर्णी या ठिकाणी हॉटेल जंजिराची उभारणी केली. या व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना त्यांनी पुढे मोरया ट्रेडर्स माध्यमातून स्टील, सिमेंट, पत्रे विक्रीचे उद्योग व्यवसाय चालू केला. पुढे त्यांनी मोरया उद्योग समूह या माध्यमातून लँड डेव्हलपर्स, मोरया फायनान्स, मोरया कंस्ट्रक्शन माध्यमातून अनेक व्यवसाय व बांधकाम क्षेत्रामध्ये प्रगती करीत आपले जीवनमान उंचावले. त्यांच्या या प्रगती बरोबर त्यांच्या सौभाग्यवती पत्नी माधुरी काळे यांचाही विशेष सहभाग त्यांना मिळाला. त्याचबरोबर त्यांचे जेष्ट बंधू सुहास काळे यांनी माऊली मेडिकल कंदर येथे उभारले असून त्यांची सदैव साथ डॉक्टर काळे यांच्याबरोबर असते. इंदापूर येथे गुलाबराव इंगळे पेठ या ठिकाणी भव्य असे व्ही.एस मार्ट ची उद्योजक राजाभाऊ इंगळे यांच्या सहयोगाने उभारणी केली आहे.
अशा पद्धतीने डॉ मनोज काळे यांनी वैद्यकीय सेवा देण्यापासून ते उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपला ठसा उमटवला आहे. यामध्ये त्यांचे व्यावसायिक मित्र राजाभाऊ इंगळे,संतोष खटके, प्रमोद कुटे , विनोद पाटील सर, गोरख खटके सर व इतर अनेक युवा उद्योजक यांचाही मोलाचा वाटा त्यांच्या जीवनात दिसून येत आहे. मैत्री कशी जपावी याचे उदाहरणही त्यांच्या या जीवनशैलीतुन दिसून येत आहे.
“लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती”
याचे उत्तम उदाहरणा नुसार डॉ. मनोज काळे हे पेशाने डॉक्टर असूनही उद्योग क्षेत्रात भरारी घेणारा एक अवलिया असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अभिष्टचिंतन दिनानिमित्त ओंकार काळे मित्र परिवाराच्या व मोरया उद्योग समूहाच्या सदस्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत

