शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
शिर्डी शहरातील डॉ संतोष राजाराम कोते सहाय्यक रासायनिक विश्लेषक प्रा ण्या वै प्रयोगशाळा महा शा छा संभाजीनगर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी घेण्यात आलेल्या परीक्षेत उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर वर्ग 1 न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग महाराष्ट्र शासन या पदावर महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळवून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कार करताना शिर्डी वि वि स सोसायटीचे मा चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते समवेत राजाराम मारुती कोते, मधुकर जगताप, कैलास गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

