shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय ग्राहक दिनी तहसिलदारांनी घेतला विविध प्रश्‍नांचा आढावा..


अकोले - आज 36 वा राष्ट्रीय ग्राहक दिन पंचायत समिती सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयावर सखोल चर्चा होऊन ग्राहकांनी अनेक तक्रार मांडल्या. यात प्रामुख्याने अकोले, देवठाण, सिन्नर रस्त्याचे रूंदीकरणाचे कामात खडीवर माती टाकल्याचे फोटो अधिकार्‍यांना दाखविण्यात आले. तर कोल्हार घोटी राज्यामार्गो काम अत्यंत संथ गतीने चालु असल्याची तक्रार देखील माडण्यात आली. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तहसिलदार सतीश थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना तातडीने सुचना दिल्याा
.
याशिवाय अकोले आदिवासी गावामध्ये ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक मुख्यालयात थांबत नाही, पशुधन अधिकारी बर्‍याच गावांमध्ये नसतात, त्यामुळे जनावरांवर खाजगी डॉक्टरांकडून महागडे उपचार करावे लागतात, रेशन चे धान्य दर महिन्यास मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. तरलव्हाळवाडी, पाचनई येथील आंगणवाडी बंद असल्याने मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सेतु कार्यालयात व आधार कार्ड सेंटर ला सुरू असलेली लुट, नगर अर्बन बँकेत ठेवलेली रक्कम परत मिळत नाही, ग्रामीण रूग्नालयांत औषधांचा तुटवडा, साई अर्पण ट्रॅक्टर कडून सेवा मिळत नाही, शासकीय कार्यालयात राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींचे फोटो लावले जात नाहीत.

स्टेट बँक, महाराष्ट्र बँक शाखा राजूर मध्ये योग्य सेवा मिळत नाही. विज प्रश्‍न, कॅनॉल, रस्त्यांच्या तक्रारी, खते व बि-बियाणांमध्ये होत असलेली फसवणुक अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी मांडल्या. याबाबत तहसिलदार यांनी संबंधित खात्यांना याबाबत सुचना देऊन त्वरीत योग्य सेवा देण्यास सांगितले जाईल असे सांगितले.

यावेळी प्रा. सुनिल शिंदे, ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, राम रूद्रे, ज्ञानेश पुंडे,  माधवराव तिटमे, प्रा.रामनाथ काकड, वसंत बाळसराफ, विनय वाकचौरे, बाळासाहेब बनकर, संतोष मुतडक, अ‍ॅड. राम भांगरे, अ‍ॅड. दीपक शेटे, शोभा दातखिळे, प्रतिभा सूर्यवंशी, नंदु गायकवाड, सखाराम खतोडे, अनंत घाणे, सुनिल देशमुख, रामदास पांडे, दत्ता ताजणे, शुभम खर्डे, सुदिन माने, सुदाम मंडलिक, हरिभाऊ अस्वले, नवनाथ आवारी, महसुलचे नायब तहसिलदार उबाळे, सहा. निबंधक कांदळकर, मार्केट कमिटीचे आळे, सा.बां. चे शेळके, आढारी, गटविकास अधिकारी शेळके, शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते, पुरवठा लिपीक दत्तात्रय कोल्हाळ, नगर पंचायत चे अनिल बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालक प्रमोद मंडलिक यांनी केले तर आभार रमेश राक्षे यांनी मानले.


close