*CYDA व PRAJ फाउंडेशन यांचे मार्फत बांडेवाडी शाळेत पुस्तक वाटप.
*कला क्रीडा महोत्सवातील यशस्वी मुलांचा शाळा समिती मार्फत सत्कार.*
ग्रामपंचायत पळसदेव यांचेकडून शाळेस स्पीकर सेट व वाँटर फिल्टर.
इंदापूर प्रतिनिधी: दि ३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे *पंचायत समिती इंदापूर , cyda व praj फाउंडेशन यांचे संयुक्तपणे* इ 1ली ते 4थी च्या मुलांची गुणवत्ता वाढीसाठी वाचन , लेखन क्षमता विकास उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असणारी *मराठी , गणित व इंग्रजी* विषयाच्या तीन पुस्तकांचा संचाचे शाळा समिती पदाधिकारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
त्याच प्रमाणे *ग्रामपंचायत पळसदेव यांचेकडून शाळेस स्पीकर सेट व वाँटर फिल्टर दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.* यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात यश संपादन केलेल्या मुलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. *यावेळी सीवायडीए समन्वयक किरण यादव यांनी उपक्रमाविषयी पालकांना मार्गदर्शन केले.*
यावेळी शाळा समिती अध्यक्ष दिपक बांडे , सतिष बांडे , बापुसो राहिगुडे , सचिन बांडे , राजू मुलाणी , अमोल बांडे , दादा पवार , भगवान भुई , संगिता बांडे , सिरीन सय्यद , सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे , ललिता वाघमोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.

