श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त- शौर्य प्रतिष्ठान इंदापूर यांच्या माध्यमातून IT क्षेत्रातील विविध कोर्सेस मोफत संकल्पनेला प्रतिसाद.- राहुल गुंडेकर .
मा. राज्यमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्तिती मध्ये होणार हे प्रशिक्षण !
४५० विद्यार्थ्यांचा सहभाग - राहुल गुंडेकर यांची महिती.
इंदापूर प्रतिनिधी:श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या IT क्षेत्रातील विविध कोर्सेस मोफत या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद इच्छुक व गरजूवंत विद्यार्थ्यांनी नोंदवला, जवळपास ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्या इंदापूर सह अनेक तालुक्यातून कमी कालावधी मध्ये लाभला आहे सदर संकल्पनेला विद्या प्रतिष्ठान इंदापूर कॉलेज चे विशेष सहकार्य लाभले आहे .
त्याचबरोबर शनिवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता IT COURSES चा विनामूल्य सेमिनार/मीटअप आणि ऑनलाइन प्रशिक्षण गुरुकृपा सांस्कृतिक भवन, इंदापूर येते TATA STRIVE कंपनी च्या माध्यमातून घेतले जाणार आहे व प्लेसमेंटसाठी मोठी संधी मिळणार आहे - अशी माहिती शौर्य प्रतिष्ठान इंदापूर च्या माध्यमातून देण्यात आली व सहभाग विद्यार्थ्यांनी सेमिनार/मीटअप प्रशिक्षणला सर्वांनी उपस्तीथ राहावे हे आव्हान केले.

