shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सूर्यकांत (आप्पा) मारूतराव रणवरे यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर - उत्तमराव फडतरे.

सूर्यकांत (आप्पा)  मारूतराव रणवरे  यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर - उत्तमराव फडतरे.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन ई एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथे दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी फडतरे नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव फडतरे, मातोश्री अहिल्यादेवी शिक्षण संस्था अंथूर्णे चे संस्थापक अध्यक्ष युवराज मस्के, वकील जयकुमार नलवडे ,उद्योजक पोपट नलवडे या मान्यवरांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली.
 यावेळी सूर्यकांत मारूतराव रणवरे (आप्पा) यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहून फडतरे नॉलेज सिटी कळंबचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव फडतरे यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. 

तसेच मातोश्री अहिल्यादेवी शिक्षण संस्था अंथूर्णे चे संस्थापक अध्यक्ष युवराज मस्के आपल्या मनोगतात म्हणाले की, येथील विद्यार्थी खूप शिस्तप्रिय आहेत. शिक्षक स्टाफ आनंदी व उत्साही आहे तर शालेय परिसर देखील खूप स्वच्छ व सुंदर आहे. हे सर्व पाहून नक्कीच या विद्यालयाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी जयकुमार नलवडे व उद्योजक पोपटराव नलवडे उपस्थित होते. 

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सन्मान विद्यालयाचे उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रनवरे व संस्था सचिव धनंजय रणवरे तसेच प्राचार्य चंद्रकांत रनवरे, पर्यवेक्षक मधुकर खरात, विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 

आभार प्रदर्शन पर्यवेक्षक मधुकर खरात यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मलगुडे यांनी केले.
close