*बांडेवाडी शाळेत महिलांचे हस्ते ध्वजारोहन..*
*74 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम घेत उत्साहात साजरा.*
इंदापूर प्रतिनिधी: दि 26 भारत देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी विविध उपक्रम घेत उत्साहात साजरा करण्यात आला. *बांडेवाडी येथील प्राथमिक शाळेत उपस्थित महिलांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.* शाळा समिती अध्यक्ष दिपक बांडे यांनी मांडलेल्या सुचनेचे सर्वानी स्वागत केले. महिलांनी आभार मानले.
यावेळी *प्रभात फेरी , ध्वजारोहन , राष्ट्रगीत , ध्वजगीत , कवायत , मनोरे , विद्यार्थी भाषणे , कविता गायन , बक्षिस वितरण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.* जनार्धन गावडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी , पालक , ग्रामस्थ , युवक , महिला उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , मदतनीस उर्मिला बांडे यांनी सहकार्य केले.आभार ललिता वाघमोडे यांनी मानले

