*गौराईमळा शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न*
शाळेच्या गेटवरील कमान व रंगरंगोटीसाठीचा विषय ग्रामस्थांन समोर मांडण्यातआला दिलदारपणाने यावेळी ग्रामस्थांनी केली वर्गणी जमा.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २६ जानेवारी आज जिल्हा परिषद शाळा गौराईमळा शेळगाव शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.या मध्ये प्रथम मुलांची प्रभात फेरी काढुन नंतर ध्वजपुजन व ध्यजारोहन शालेय व्य. समितीचे अध्यक्ष सन्मान विलास शिंगाडे व ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्गीत ध्वजगीत व संविधान वाचन करुन मुलांची मराठी व इंग्रजी भाषणे झाली नंतर शाळेच्या गेटवरील कमान व रंगरंगोटीसाठीचा विषय ग्रामस्थांन समोर मांडण्यात आला. यावर अरुण जाधव सर १५००० , शेवंता भोसले मॅडम ११००० ,दिपक शिंगाडे ३०००,तात्यासाहेब शिंगाडे २१००,प्रदिप खरात २१००,भारत जाधव २१०० व अमोल जाधव या सर्वानी वरील कामासाठी मोठ्या मनाने एकुण *३६३००* वर्गणी जमा केली.वरील सर्व देणगीदारांचे शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शेवटी खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर व आभार उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी मानले.या वेळी रेश्मा जाधव ,मनिषा जाधव ,अंगणवाडी सेविका सुनिता सोनवणे,मदतनीस कल्पना जाधव,पद्मराज जाधव ,पोपट शिंगाडे ,अमोल नाझरकर ,सुरेश शिंगाडे संजय वायसे व इतर सर्व ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थिती होता

