shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..*

*भिमाई  आश्रमशाळेत  प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..*
*इंदापूर प्रतिनिधी (२६ जाने.२०२३)* :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे , मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन (दि.२६) सकाळी ठीक ८:०५ वा.अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस , इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण मा.मधुकर लक्ष्मण जगताप ( सेवानिवृत्त, हवालदार, भारतीय सैन्यदल) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात मुलींनी झंडा गीत गायले.
 सदरचा सोहळा इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु.शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ,कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे,संचालक गोरख तिकोटे,संजय कांबळे,संचालिका अस्मिता मखरे तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अश्वजित कांबळे, शिवाजीभाऊ चंदनशिवे,तुषार गुजर, राजाभाऊ जगताप,गोरख चौगुले, सचिन बेसरे व संस्थेतील मुख्याध्यापक,प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे  प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले तर सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
close