shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणास सुरुवात...


हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)

हिंगोली:-दि.२५,सेनगांव तालुक्यातील रेपा,लिंग पिंपरी, हुडी तांडा उमरदरी या गांवाना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१८-१९ अंतर्गत रोड कामाला मंजुरी मिळाली होती परंतु कामाची मुदत संपुन तिन वर्षे झाले ते रोडचे काम अपुर्णच राहीले ते रोडचे काम तात्काळ सुरु करावे व संबधीत कंट्रक्शन कंपनी व काँट्रँक्टदार व संबधीत अधिकार्‍यावर कारवाई करावी यासह विविध मागणीचे निवेदन देऊन दि.२५ जानेवारी बुधवार पासुन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अमरण उपोषणास सुरुवात केली आहे.



मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१८-१९ अंतर्गत सेनगाव तालुक्यातील रेपा,लिंग,पिंपरी,हुडी तांडा व उमरदरी या गांवाना रोडच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली होती परंतु या कामाची मुदत संपुन ही या रोडचे काम अपुर्णच आहे.


या संबधी समितीच्या वतीने अनेक वेळा निवेदन देऊन सुध्दा दाद मिळेना म्हणून आज दि.२५ जानेवारी बुधवार रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन शासन व प्रशासन यांची फसवणुक करणार्‍या कंट्रक्शन कंपनी व काँट्रँक्टदारावर कारवाई करा, संबधीत काँट्रँक्टदारासोबत संगणमत करुन सतत मुदतवाढ देऊन वेळेवर काम पुर्ण न करुन देणार्‍या गैर जिम्मेदार अधिकार्‍यावर कारवाई करा,संबधीत रस्ताकाम इंस्टयुमेंट प्रमाणे पुर्ण करण्यासंदर्भात लागणारा कालावधी निश्चित करुण सक्षम जिम्मेदार अधिकार्‍यांनी लेखी स्वरुपात नमुद करुन द्यावा,संबधीत अधिकार्‍यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करुन केलेले कारवाईचा अहवाल द्यावा या व विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२५ जानेवारी पासून अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली असून यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,मराठवाडा संघटक सचिन दराडे,युवा जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे,महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई थिट्टे,महिला जिल्हा कार्याध्यक्षा आशालता घोडके,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख विश्वनाथ देशमुख,सेनगाव तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे,औंढा तालुकाध्यक्ष संतोष वानखेडे,कळमनुरी तालुकाध्यक्ष रविकुमार गोरे,सेनगाव युवा तालुकाध्यक्ष नितिन कुटे,हिंगोली तालुकाध्यक्ष बाळु सुर्वे,वसमत तालुकाध्यक्ष रमेश साळवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

close