shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई येथे कै. राजाराम चिमाजी कुसळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे किर्तन संपन्न...!

सोनई:- आज कुसळकर वस्ती येथे सोनई परिसरात सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले कै राजारामभाऊ चिमाजी कुसळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त संतश्री ज्ञानेश्वर माऊली संस्थान,
नेवासा चे मठाधिपती हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी कै.राजाभाऊंनी केलेल्या कामाचे अनेक दाखले देत त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या अमृत वाणीतून किर्तन केले.



 कै.राजाभाऊंनी गरीब दिन दुबळ्यांची निस्वार्थ वृत्तीने सेवा केली. जे आयुष्य मिळाले त्याचा कै.राजाभाऊंनी क्षणोक्षणी सत्कारणी लावले.

 कै.राजाभाऊंनी भुविकास बॅंक संचालक, मार्केट कमिटी संचालक, श्रीरामपूर दुध संघ संचालक, मुळा सहकारी साखर कारखाना,सोनंई २५ वर्षं संचालक पद तसेच अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटना, अहमदनगर जिल्हाध्यक्ष  असे अनेक पदे भुषविले. ते नेवासा तालुक्यातील सर्व गावातील लहान मोठ्यांना परिचित होते. अशी त्यांची किर्ती अगाध होती..कै. राजाभाऊंनी प्रपंचाबरोबर सर्वांची सेवा केली.. कधी कुणाचा भेद भाव केला नाही.‌ अशाच.पध्दतीने मुलांनी देखील देशसेवा, सामाजिक सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.. 


यावेळी जेष्ठ नेते विश्वास मामा गडाख पा.,कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर,ॲड.घावटेमामा, राजूभाऊ गुगळे, ॲड.सुभाष दरंदले, दादासाहेब दरंदले, रामशेठ अट्टल,भाऊसाहेब येळवंडे, गोविंदराव मिरे , हरिभाऊ धनवडे, शिवराम मिरे,अप्पासाहेब निमसे , सोनवणे काका, रमेश आणि राहुल  यांचा मित्र परिवार व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पानस वाडी, सोनंई व नेवासा येथील भजनी मंडळ यांनी हभप सुखाळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाची साथ दिली. 

पुण्यस्मरण दिनानिमित्त 71000 रुपयाची देणगी...

यावेळी गरिब व गरजू व्यक्तींना थंडी वाढत असल्याने उबदार कपड्यांचा लाभ व्हावा.यासाठी उदात्त हेतूने कुसळकर परिवाराने यश ग्रुप व पसायदान आनंदवन सेवाभावी संस्था,सोनई यांना जेष्ठ नेते विश्वास मामा गडाख यांच्या हस्ते ७१००० रूपयाचा धनादेश सुपुर्द करण्यात आले.

मा. मंत्री नामदार श्री. शंकरराव गडाख यांनी  कै.राजाभांऊंनी वाहिली आदरांजली...!

या कार्यक्रमाला नामदार गडाख यांनी विशेष हजेरी लावून कै.राजारामभाऊ कुसळकर यांच्या जुन्या आठवणीचे स्मरण करत प्रतिमेचे दर्शन घेऊन पुष्पांजली अर्पण केली..या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंतराव  कुसळकर, रामेश्वर कुसळकर, रामदास कुसळकर, रमेश राजाराम कुसळकर, राहुल राजाराम कुसळकर , शांताराम सुपारे, मच्छिंद्र तागडकर आणि कुसळकर परिवारातील सर्वांनी प्रयत्न केला.
close