shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी,फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने साई मंदिराला आरस || प्रसादासाठी 9 हजार किलो बुंदीचे लाडू..!!

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी..!!
फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने साई मंदिराला आरस || प्रसादासाठी 9 हजार किलो बुंदीचे लाडू..!!

शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी  शिर्डीत  लाखो भाविकांनी हजेरी लावली. शिर्डीत साईभक्तांची  अलोट गर्दी झाली. आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने साईमंदिर  फुलुन गेले. संस्थानकडून 9 हजार किलो बुंदीचे साजूक तुपातली लाडू प्रसादासाठी  तयार करण्यात आले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी
नव वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने व्हावी यासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत आहे. साई भक्तांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थान प्रशासनाकडून शनिवारी 31 डिसेंबर रोजी संपूर्ण रात्र मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागताकरिता साईबाबा संस्थाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. करोनाच्या संकटानंतर सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता व नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत शनिवारी लाखो भाविक दाखल झाले आहे.

साईंचे दर्शन घेण्याकरिता व राहण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता संस्थेने भाविकांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था उभारली आहे. भक्तांना चहा व भोजन विनामूल्य देण्यात येणार असल्याने फक्त दहा रुपयात शिर्डी  येथे येणार्‍या सामान्य भाविकांसाठी एक दिवसासाठी थांबण्याकरिता साईबाबा संस्थाने प्रथम व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन साईबाबा संस्थाने भक्ती निवास जवळ 28 हजार चौरस फुटाचे मंडप उभारले आहेत. या मंडपात भाविकांना झोपण्यासाठी गादी व चादर दहा रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. साई भक्तांना भोजन घेण्यासाठी प्रसादलयात जाण्याकरिता वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्याकरिता अनेक तास उभे राहण्याची गरज भासू नये याकरिता शनिवारीची 31 डिसेंबरची 10 वाजे दरम्यानची शेज आरती तसेच रविवारची एक जानेवारीची काकड आरती रद्द करण्यात आली असून शनिवार व रविवार या दोन दिवसाची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी..!!

शनिवारी 31 डिसेंबर व रविवारी एक जानेवारी शिर्डीत जवळपास 4 लाख साईभक्तांनी साई समाधीचे दर्शन घेतील असा अंदाज आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत विविध राज्यातून हजारो साई भक्तांनी पायी चालत हजरी लावत साई नामाचा जयघोष करत पालखी मिरवणुक बँडच्या मधुर सुरांनी शिर्डी दुमदुमली होती. शनिवार व रविवार या सुट्ट्या जोडून आल्यामुळे शिर्डी विविध राज्यातून येणार्‍या वाहनांची संख्या मोठा प्रमाणात असल्यामुळे शिर्डी महामार्ग व उपनगरात वाहनांची कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. बेशिस्त चालणार्‍या वाहन चालकांना शिस्त लावण्याकरिता पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतल्याचे दिसून आले.

शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन निघोज ते निर्मळ पिंपरी या बाह्य वळण रस्त्यावर मोठ्या अवजड वाहनांची ट्रॅफिक वळवण्यात आली होती. साई भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत साईनगरीत भक्तांचे मोबाईल व पाकीट चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याने भक्तांनी या बाबत नाराजी दर्शवली. साईबाबा संस्थानचे भक्ती निवास 1500 रूम तसेच 500 रूम व्दारावती 360 रूम साई धर्मशाळा येथील 192 हॉल व साईप्रसाद निवासस्थान येथील 141 या साईबाबा संस्थानचे सर्व भक्ती निवास तसेच शिर्डी येथील खाजगी जवळपास 100 खाजगी लॉजिंग भक्तांच्या गर्दीमुळे हाउसफुल झाल्या आहेत.
बाहेरील देशात करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याने खबरदारी म्हणून शिर्डी येथे येणार्‍या जवळपास 70 टक्के साईभक्तांनी तोंडाला मास्क लावले होते. संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी भक्तांना दर्शन घेण्याकरिता कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती.

'करोना काळानंतर यावर्षी प्रथमच साईचरणी साई भक्तांनी वर्षाभरात 400 कोटीचे दान दिले आहे. सरासरी प्रत्येक दिवसाला 1 कोटी पेक्षा जास्त दान दानपेटीत जमा झाले आहे. देणगी काउंटर, डेबिट व क्रेडिट कार्ड, ऑनलाइन, चेक, डीडी, मनी ऑर्डर तसेच 336 किलो चांदी व 25 सोने असे एकूण 400 कोटीचे भरभरून दान भक्तांनी अर्पण केले आहे.'

"नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भक्तांना लाडू प्रसादाची कमतरता भासू नये याकरिता संस्थान प्रशासनाने नऊ हजार किलो बुंदीचे लाडू तयार केले असून 25 रुपयात साई भक्तांना साजूक तुपातले 3 लाडू पाकीट देण्याची व्यवस्था केली आहे. "

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close