*भविष्यात देशपातळीवर एक गुणवत्ता देणारे एक शैक्षणिक संकुल कसे उभे राहील यासाठी आम्ही प्रयत्न- अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ
गुरुकुल गोखळी शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत ९४ विद्यार्थ्यांसह पटकविला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक*
इंदापूर प्रतिनिधी:विद्यार्थी अनेक उपक्रमांच्या, कलेच्या तसेच परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे व शाळेचे नाव विविध स्तरावर उंचावण्याचे काम करतात त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल विद्यामंदिर गोखळीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावून अजून एक तुरा लावण्याचे कार्य केल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आत्ताच जाहीर झाला सदर परीक्षेच्या निकालामध्ये गुरुकुल विद्यामंदिर गोखळीच्या शाळेतील एकूण ९४ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहे. असा ऐतिहासिक विक्रम गुरुकुल विद्यामंदिर गोखळीने पटकावून महाराष्ट्रात गुणवत्तेच्या पटलावरती प्रथम क्रमांक पटकवला आहे. शाळेतील इयत्ता ५वी मध्ये म्हणजेच पूर्व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मध्ये एकूण 24 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर इयत्ता ८वी मध्ये म्हणजेच पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व 63 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहे.
सदर यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा येथोचित सन्मान केला यामध्ये मुख्याध्यापक विश्वास हुलगे, सहाय्यक शिक्षक जाविद मुलानी, सुरेश वरकड, संदीप बारवकर, अविनाश नरुटे, अश्विनी नरुटे, गणेश पाटील व इतर सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब हरणावळ म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याची कार्य गुरुकुल विद्यामंदिरचे सर्व शिक्षक करीत आहेत. भविष्यात देशपातळीवर एक गुणवत्ता देणारे एक शैक्षणिक संकुल कसे उभे राहील यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी सुतार यांनी केले प्रास्ताविक पुनम पोंदकुले तर आभार नामदेव तरंगे सर यांनी मानले.

