shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १२ /  चास येथील सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये  दि. १२ जानेवारी रोजी  राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी  करण्यात  आली.  

        या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्रा. जगधने एम के यांनी स्वामी विवेकानंद हे एक महान विचारवंत होते ज्यांनी जगभरात भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीला एक नवीन ओळख दिली.  हा दिवस देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपणा सर्वांसाठी फारच प्रेरणादायी  आहेत. तसेच राजमाता जिजाऊ आऊसाहेब  यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बीज मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरले. "तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे!" असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले. जिजाऊ आऊसाहेब  खरोखर आदर्श माता आहेत. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.एस. गडाख, सिव्हील विभागाचे प्रा. तरटे आर. आर.,  इलेक्ट्रॉनिक विभागातील प्रा.पाळंदे एस.सी. , प्रा.आहेर एस.के , संगणक विभाग प्रमुख प्रा. होले डि.पी. , प्रा. पालवे पी.बी., यंत्र विभागाचे प्रा. भुतकर टी. वाय. तसेच  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.
close