shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी

भिमाई आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी
इंदापूर प्रतिनिधी :- (दि.१२) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजमाता जिजाऊ माँसाहेबांची ४२५ वी जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी प्रा. झेंडे मॅडम व मनिषा जगताप 
 यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस,दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुलांची भाषणं झाली. तसेच शिक्षकांनी जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनावर माहिती सांगितली. यावेळी  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कोल्हे  यांनी केले.
close