shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

के.के .पेढा ही शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेला ब्रँड - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

के.के .पेढा ही शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेला ब्रँड - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

आत्ता इंदापूरकरांच्या खवय्यांसाठी दौंडचा सुप्रसिद्ध के. के. पेढा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन 
इंदापूर प्रतिनिधी: के.के. पेढा ही शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेला ब्रँड आहे. के.के. पेढ्याच्या अठराव्या शाखेचे उद्घाटन इंदापूर शहरात व्यंकटेशनगर येथील आशीर्वाद बिल्डिंग मध्ये दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी  बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  आपले मत व्यक्त केले.

तसेच ते म्हणाले की, नवीन व्यवसाय आपल्या इंदापूर तालुक्यात इंदापूर शहरात होत आहे. आज राजमाता जिजाऊं यांची जयंती, युवा दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती च्या शुभमुहूर्तावर के.के. पेढा ही शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या ब्रँड आहे. के.के. पेढ्याच्या १८ व्या शाखेचे उद्घाटन आज झाले असून जवळजवळ २२ फ्रेश उत्पादन पेढा, खावा, बर्फी, पनीर, मलई बर्फी, कंदी पेढे एवढे गरम या ठिकाणी सदर फलकावर दाखवण्यात आलेले सगळे फ्रेश पदार्थ आज या के.के. पेढ्याच्या माध्यमातून इंदापूर शहरात आपल्याला मिळणार आहेत. 
तसेच ते पुढे म्हणाले की, इंदापूर शहराचे मार्केट वाढू लागले आहे. हायवे वरचे गाव विस्तारित होऊ लागले आहे. उत्पादन वाढू लागले  चलन, भांडवल या शहरात लॉकडाऊन वगळता आता बऱ्यापैकी व्यवसाय सुरू झालेले आहेत. आम्हाला आनंद वाटतो आहे की, इंदापूर तालुक्यामध्ये आपण बारामतीला दोन-तीन शाखा आपल्या आहेत. आता इंदापूर मध्येही त्याची शाखा आजपासून इंदापूरकरांसाठी उपलब्ध झाली असून त्यास इंदापूरकर सहकार्य करतील अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी एडवोकेट धर्मेंद्र खांडवे, आबा पाटील, कैलास कदम, बाळासाहेब मोरे, शेखर पाटील, उत्तम जाधव, सुभाष काळे ,दादा पिसे, धनंजय पाटील, गोरख शिंदे, शेटे सर ,शिवाजीराव शिंदे, अविनाश कोतमिरे, सागर गानबोटे, के.के. पेढा चे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कार्यकारी संचालक रमेश शिर्के,  यवत फेमस साईकृपा चहाचे बंटी शेठ देवकर,सुरज यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.

तसेच नगराध्यक्ष अंकिताताई शहा, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव मुकुंदशेठ शहा, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष,भरतशेठ शहा, माजी नगराध्यक्ष मायाताई विंचू , पांडुरंग शिर्के,रासपाचे शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, डॉ. प्रदीप दडस इतर अनेक मान्यवर यांनी या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती के.के. पेढा चे कार्यकारी संचालक रमेश शिर्के यांनी दिली.
close