स्वामी विवेकानंद हे एक महान विचारवंत - गणेश बोरा
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : १२ / करमाळा शहारातील मेनरोड पोथरनाका चौक येथे दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या वेळी गणेश बोरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती देताना सांगितले की , स्वामी विवेकानंद हे एक महान विचारवंत होते ज्यांनी जगभरात भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीला एक नवीन ओळख दिली. हा दिवस देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपणा सर्वांसाठी फारच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी वैभव दोशी, गणेश बोरा,आशिष बोरा,बंडू मोरे, शेखर सावंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

