shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स "जीवन जगण्याची कला" हॅप्पीनेस प्रोग्रॅम हा कोर्स सर्वांनी करावा - प्रशिक्षक अमोल देवकाते यांनी केले आव्हान.


आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स "जीवन जगण्याची कला" हॅप्पीनेस प्रोग्रॅम हा कोर्स सर्वांनी करावा - प्रशिक्षक अमोल देवकाते यांनी केले आव्हान.
इंदापूर प्रतिनिधी:अॉर्ट अॉफ लिव्हिंग परिवार  इंदापूर. सुदर्शन क्रिया  इंदापूर राधिका माध्यमिक विद्यालय कालठण रोड इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक अमोल देवकाते व रुक्मिणी  देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग संपन्न झाली. यावेळी योग प्रशिक्षक अमोल देवकाते यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स "जीवन जगण्याची कला" हॅप्पीनेस प्रोग्रॅम हा कोर्स सर्वांनी करावा असे आव्हान करण्यात आले. या धगधगीच्या जीवनामध्ये योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, ध्यान, सुदर्शन क्रिया करणे महत्त्वाचे आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये इंदापूर शहरात हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.
 यावेळी इंदापूर नगरपरिषद नगरसेवक अनिकेत वाघ, विराज जगताप, विकास खिलारे, सुधीर मखरे, महादेव लोखंडे, तुकाराम कांबळे, मुख्याध्यापक दत्तात्रय दडस, योगशिक्षक शरद झोळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षिका सुनिता मोरे तसेच सर्व शिक्षक वृंद व राधिका विद्यालय स्टाफ उपस्थित होते.
close