shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

किरण काळे युवा मंचच्या वतीने पळसदेव येथे बिस्कीट वाटप.

किरण काळे युवा मंचच्या वतीने पळसदेव येथे बिस्कीट वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसदेव या ठिकाणी‌ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व विद्यार्थी, नागरिक, ग्रामस्थ यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी मोर्चाचे उपाध्यक्ष अक्रम अब्बास शेख, भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे आणि पळसदेवचे सामाजिक कार्यकर्ते अंबादास भिसे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊसाठी १२ डझन पारले बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. 
यावेळी गीता शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा नंदाताई हनुमंत बनसुडे, संचालक उत्तम बनसुडे, कनकेताई, सचिव नितीन बनसुडे सर, प्राचार्य वंदना बनसुडे, क्रीडा प्रशिक्षक सागर बनसुडे सर, कैलास होले सर, अमोल मिसाळ सर तसेच शाळेचा सर्व स्टाफ, विद्यार्थी व पळसदेवचे नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

close