shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.भारत आजिनाथ भोई यांचे स्मरणार्थ पळसदेव येथे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या शिबिराचे आयोजन.

कै.भारत आजिनाथ भोई यांचे स्मरणार्थ पळसदेव येथे केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या शिबिराचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: पळसदेव चे सुपुत्र कै.भारत आजिनाथ भोई(पोलीस नाईक) यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्डाचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे यांच्या हस्ते करण्यात आले. पळसदेवचे आधार केंद्र प्रमुख मा.श्री.हमीद तांबोळी यांच्या ग्रामपंचायत कार्यालय गाळा नंबर.१ या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत लाभार्थ्याला पाच लाखापर्यंत दवाखान्याचा मोफत खर्च मिळणार आहे.

या आयुष्यमान भारत कार्ड मोफत वाटपाच्या शिबिराला प्रजासत्ताक दिनी पळसदेव येथे भेट दिली. हमीद तांबोळी, किरण रंधवे, प्रशांत गांधले, विशाल काळे यांचे विशेष सहकार्य या शिबिराला लाभले. पळसदेवचे ग्रामस्थ अंबादास भिसे यांना या आयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास 100 नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले असल्याचे त्याचबरोबर पुढील पंधरा दिवसात यापेक्षा मोठ्या कॅम्पसचे आयोजन करणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले आहे. पळसदेव मधील राहिलेल्या सर्व नागरिक व ग्रामस्थांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेते किरण काळे यांनी केले आहे. 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव किरण काळे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्रम अब्बास शेख, सामाजिक कार्यकर्ते अंबादास भिसे, हमीद तांबोळी, किरण रंधवे, प्रशांत गांधले, विशाल काळे उपस्थित होते.
close