पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सचिव व सध्याचे राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे प्रशासन सदस्य प्रविणसिंह परदेशी, बाँम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक भावेश पांडव यांनी कडबनवाडी वने पर्यटन केंद्रास दिली भेट.
इंदापूर प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सचिव व सध्याचे राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे प्रशासन सदस्य
प्रविणसिंह परदेशी, बाँम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक भावेश पांडव यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी वने पर्यटन केंद्रास शुक्रवारी १३ जानेवारी रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी याठिकाणी वृक्षारोपन देखील केलयं कडबनवाडी वने पर्यटन केंद्र हे चिंकारा, लांडगे, तरस, कोकडं, गरुड, टिटव्या यांसह अनेक वन्यजीवांसाठी प्रसिध्द आहे.
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी वने पर्यटन केंद्र हे नुकतेच नावारूपाला आले आहे ऑक्सिजन पार्क म्हणून त्याची एक वेगळी ओळख झाली असून या ठिकाणी अनेक वन्य जीवांचा अधिवास आहे फ्रेंन्स ऑफ नेचर क्लब या ठिकाणच्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्तशील राहिला आहे
या पर्यटन केंद्रास भेट दिल्यानंतर परदेशी यांनी समाधान व्यक्त केले असून यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचेच त्यांनी कौतुक केले आहे दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना संपर्क साधून या भागाच्या विकासासह इंदापूर तालुक्यातील वन्य प्राण्यांसाठी सोलर पंप, वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी वन तळी निर्मिती करावीत याच्या सूचना केल्या.
देशभर प्रसिद्ध असलेल्या बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचे संचालक भावेश पांडव यांनी देखील या परिसराची पाहणी केली. या विभागाचा नैसर्गिक वन्य पक्षी यांचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्रज्ञ देण्याचेही त्यांनी घोषीत केले
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, उपवनसंरक्षक प्रादेशिक पुणे राहुल पाटील, वन्यजीव पुणे तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक आषुतोश शेंडगे , इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकार अजित सुर्यवंशी, वनरक्षक शेळगाव गणेश बागडे,वनरक्षक विशाल शेटे ,सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे अँड सचिन राऊत, वालचंदनगर अमोल राजपूत,विजय कांबळे, सरपंच दादासाहेब जाधव, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

