shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाखेवाडीमध्ये मल्हार महोत्सवात विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे मनमोहक व थरारक नाट्याविष्काराचे सादरीकरण.



लाखेवाडीमध्ये मल्हार महोत्सवात विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे मनमोहक व थरारक नाट्याविष्काराचे सादरीकरण.
 
जे.बी.व्ही.पीचा जीवन गौरव पुरस्कार'  रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानणारे  मंगेश चिवटे  यांना प्रदान.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या वतीने मल्हार महोत्सवाचे देखणे नियोजन.
इंदापूर प्रतिनिधी:  दिनांक १३ जानेवारी  रोजी नर्सरी ते ५ वी व १४ जानेवारी रोजी ६ वी ते ११वी व फार्मसी  असे दोन दिवस मल्हार महोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असावा लागतो . क्रीडा,  नृत्य, नाट्य, संगीत हा मनुष्य जीवनाचा एक भाग आहे. मानवाच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडायचे असेल तर अभिजात कला ही मानवाला तारक ठरते.पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला सुप्त गुणांचा विकास  होणे महत्त्वाचे आहे . सुप्तगुणांमुळेच विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न होतो.  या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी.कोळीगीते,पोवाडा,गोंधळीगीत,भक्तिगीते,लोकनृत्य,देशभक्तीगीते, योगकला,कीर्तन, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा लेक घडवा,आधुनिक तंत्रज्ञानाची अतिशयोक्ती ,अशा विविध प्रकारचे मनमोहक व थरारक नाट्याविष्काराचे सादरीकरण जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले.
लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष प्ले पार्क "JBVP's FUN KINGDOM" चा उद्घघाटन समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला .या विशेष प्ले पार्कमध्ये सर्व प्रकारची खेळणी उपलब्ध असून संस्था सदैव विद्यार्थ्यांचा सर्वांग विकास साधण्यासाठी तत्पर राहते.
 'जेबीव्हीपीचा जीवन गौरव पुरस्कार'  हा दरवर्षी मल्हार महोत्सवामध्ये कलाक्षेत्र,देशसेवा, सामाजिक कार्य व शैक्षणिक कार्य करणाऱ्या घटकांना  प्रदान करण्यात येईल व हाच पुरस्कार सामाजिक कार्य करणारे  व  'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानणारे  मंगेश चिवटे  यांना प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमामध्ये पालकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले यामध्ये दोन दिवस पालकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. 

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूचे चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले निश्चित ध्येय गाठणे,  कलेबरोरच, अभ्यासाकडे लक्ष द्यावे. चांगली संगत व शिस्त जोपासावी व चित्रपटातील गोष्टींचे अनुकरण न करता आपल्या आयुष्याला चांगली दिशा द्यावी  व चांगले अधिकारी घडावे असे सांगण्यात आले. 
 कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी  विजयकुमार परीट ,  नागनाथ पाटील (सह पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन),  दिलीप ढोले (आयुक्त मीरा भाईंदर मनपा),  आनंद भोईटे (भा.पो.से.अप्पर पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण), . प्रकाश शेळके (राज्यकर सहआयुक्त मुंबई ), .सौ.सुजाता ढोले (अति आयुक्त नवी मुंबई मनपा),  विकास काळे (राज्यकर उपायुक्त मुंबई), म
 श्रीकांत पाटील (तहसीलदार इंदापूर), . प्रदीप सूर्यवंशी (पोलीस निरीक्षक इंदापूर), . मंगेश चिवटे (मुख्यमंत्रीव वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख),. डॉ.सुहास चौरे (जेष्ठ शात्रज्ञ ग्लेन्मार्क), तसेच संस्थेचे प्रमुख अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे . श्रीमंत ढोले सर , लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच व संस्थेच्या उपाध्यक्षा .सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, संस्थेचे सचिव . हर्षवर्धन खाडे साहेब, संस्थेच्या सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे मॅडम, संस्थेचे मुख्य सल्लागार  प्रदिप गुरव सर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य .सम्राट खेडकर सर ,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी . गणेश पवार सर,सर्व सुपरवायझर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
close