shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जलजीवन मिशनमध्ये पुणे जिल्हा अग्रेसर - मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद.

जलजीवन मिशनमध्ये पुणे जिल्हा अग्रेसर - मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद.

घरकुलांचा पहिला हप्ता घेऊनही घरकुलाचे काम सुरू न करणाऱ्या ८०० लाभार्थ्यांकडून लोकअदालतच्या माध्यमातून तो हप्ता वसूल करण्याचा निर्णय 
इंदापूर प्रतिनिधी: जलजीवन मिशनमध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे. जवळपास शंभर टक्के टेंडर प्रसिद्ध केले आहेत. ८५ वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यात ३५ कामांच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत. परंतु काही गावांमध्ये ठेकेदारांनी काम सुरु केलेले नाही. ठेकेदाराच्या वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. गटविकास अधिकारी व अभियंत्यांनी त्या समजून घ्याव्यात. मात्र ठेकेदारांनी उदासीनता न दाखवता वेळेत व दर्जेदार कामे करावीत असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
     इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या विविध विभाग प्रमुखांच्या बैठकीनिमित्त ते  इंदापुरात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पशुधन विकास अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
     यावेळी बोलताना प्रसाद म्हणाले, घरकुलांचा पहिला हप्ता घेऊनही घरकुलाचे काम सुरू न करणाऱ्या ८०० लाभार्थ्यांकडून लोकअदालतच्या माध्यमातून तो हप्ता वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी नोटिसा संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.. इंदापूर तालुक्यात घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली बजावण्यात आहे. या योजनेसाठी सुमारे २,५०० लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील ८०० लाभार्थ्यांनी घरकुल बांधणीचा पहिला हप्ता घेऊनदेखील काम सुरु केलेले नाही. या महिन्यात लोकअदालतमध्ये त्याच्याकडून तो हप्ता वसूल करून घेण्यात येणार आहे. तशा नोटिसाही आल्या आहेत. अधिकान्यांना दिलेल्या सूचनेनुसार मागच्या महिन्यात इंदापूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या स्वच्छ शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रमाचा ही सकारात्मक परिणाम जाणवत आहे.
-
close