shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सा.भवानीमाता चे संपादक लक्ष्मण भिसे आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित !

सामाजाभिमुख पत्रकारिता
 करताना केले जीवाचे रान !

म्हणून पत्रकार लक्ष्मण भिसे
 यांचा होई सर्वत्र सन्मान !!


 इंदापूर:- मराठी वृत्तपत्र श्रृष्टीचे जनक तथा अद्यपर्वतक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनी बारामती आणि इंदापूर येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात विविध पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संपादक पत्रकार संघटना बारामती यांच्या विद्यमाने दि.५ जानेवारी रोजी बारामती येथे सन्मान लेखणीचा,लोकशाहीचा, पत्रकारीतेचा या उद्देशाने
पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात साप्ता.भवानीमाताचे संपादक ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण संभाजी भिसे यांना कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते पत्रकारिता व्यावसायात केवळ व्यावसायीक धोरण न जोपासता समाजसेवेस बांधील राहून पत्रकारीतेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार दिनाच्या पुर्वसंध्येला श्री.लक्ष्मण भिसे यांना आदर्श पत्रकारीता पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पुरंदर चे आमदार संजय जगताप, भगवानराव वैराट,रामहरी रुपनर, संपादक पत्रकार संघटना बारामती पदाधिकारी सदस्य, पत्रकार बंधू भगीनी आदि उपस्थित होते,
तसेच दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर व शहर ग्रामीण पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, माजी मंत्री तथा रा.स.प.चे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते श्री.लक्ष्मण भिसे यांना आदर्श पत्रकारीता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलकंठ मोहिते, महासचिव सागर शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

श्री.भिसे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,जस्टिस सिटिझन्स प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष नागेशभाई सावंत,महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष विजयराव नगरकर,महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकतअली शेख,समता फाऊंडेशनचे इंजि. मोहसिन शेख,सरताज शेख, सा. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे शाह मुश्ताकअली आदिंनी अभिनंदन केले आहे.

रामाणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांच्या आशिर्वादाने तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गत २०-२५ वर्षांपूर्वी श्री.भिसे यांनी आपली आगदी जेमतेम परिस्थिती असताना आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली, पत्रकारिता करताना त्यांनी कधीच कोणाशीही दुजाभाव केला नाही, नेहमी जनहिताच्या बातम्यांकडे कटाक्षाने लक्ष दिले, शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आपल्या साप्ताहिक भवानीमाता च्या माध्यमातून कशा पद्धतीने तळागळातील उपेक्षित आणि दुर्लक्षितांकडे पोहोचविल्या जातील याकडे सातत्याने लक्ष दिले, आपल्या वर्तमानपत्रात अधिकाधिक शासकीय बातम्यांना प्राधान्य दिले म्हणून आज त्यांचे साप्ताहिक भवानीमाता या साप्ताहिक वर्तमानपत्राची पुणे जिल्ह्यात अग्रक्रमाने गणना होत आहे हे केवळ श्री.भिसे यांची वैचारिक परिपक्वता आणि जनसामान्यांना उचित न्याय मिळवून देण्याची भुमिका छपल्यामुळेच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.जरी आर्थिक परिस्थिती कठीण असली तरी त्यावर कसे यशस्वीरित्या मात करता येवू शकते हे जर बघायचे आणि शिकायचे असल्यास श्री.भिसे यांच्या कार्यातून नक्कीच दिसून येईल,कारण परिस्थिती जरी बेताची असली तरी त्यांनी आपल्या आपत्यांना उच्चशिक्षित केले,मुलास सिव्हिल इंजिनिअर तर मुलीस वकीलीपर्यंतचे शिक्षण दिले,उपेक्षित आणि दुर्लक्षित समाज घटकातील निर्धन मनुष्याला हल्ली आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणे हे किती मोठे धाडसाची कामे आहेत, ही ज्यांची आपत्य उच्च शिक्षण घेतात व ज्यांनी घेतले आहे हे त्यांनाच ठाऊक असते.तरी श्री.भिसे यांनी आपल्या आपत्यांच्या प्रती आपले कर्तव्य पुर्ण केले,त्यांना उच्च शिक्षित करत समाजात उंच मानेने जगण्याचे स्थान निर्माण करुन दिले, खरोखरच या कार्यास जीकरीकार्य यापेक्षा दुसरे शब्द ते काय असु शकणार ? आणि हे सर्व सांगण्यामागचा हेतू केवळ इतकाच की पत्रकारीता म्हणावी तीतकी सोपी नाही, पत्रकारीता करताना नेहमी एका ठिकाणी बसून कधीच पत्रकारीता केली जात नाही व करता येत नाही,पत्रकारिता करताना दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो, भुक, तहाण,रात्र,आराम या सर्व बाबींना बाजुला ठेवावे लागते,उन वारा,पाऊस याची जराशीही तमा न बाळगता रात्री -अपरात्री मिळेल त्या प्रवास साधनांनी प्रवास करावा लागतो,तरच पत्रकारिता सफल होते आणि श्री.भिसे यांनी त्याच माध्यमातून आपली पत्रकारीता सफल केली आहे.

आपल्या साप्ताहिक भवानीमाता या वर्तमानपत्राचे नियमितपणे सातत्य टिकवून सत्य सामाजाभिमुख बातम्यांच्या आधारे जनमानसात मोठी विश्वासाहर्ता निर्माण केली आहे, श्री.भिसे यांची ही पत्रकारिता केवळ व्यावसायिक धोरण जोपासणारी अथवा समाजसेवा करणारीच नसुन एक तपश्चर्या असल्याचे दिसून येत असल्याने विविध मोठमोठ्या विभुतींच्या हस्ते पत्रकार दिनी त्यांचा आदर्श पत्रकारीता पुरस्काराने सन्मान होणे हे तर स्वभाविकच,इतर पत्रकार बांधवांनी देखील श्री.भिसे यांच्या पत्रकारीतेचा आदर्श घेत आपली पत्रकारिता सुरु करावी आणि आपणही समाजाचे काही देणं लागतो या उद्देशाने पत्रकारिता करावी म्हणजे भविष्यात नक्कीच उपेक्षित घटकांस अधिकाधिक फायदा पोहोचेल असे म्हणावेसे वाटते.श्री.भिसे यांना मिळालेल्या आदर्श पत्रकार पुरस्काराबद्दल त्यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन तसेच त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करणाऱ्या बारामती व इंदापूर पत्रकार संघाचे देखील मनस्वी आभार.
close