shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन..!

अजिजभाई शेख
राहाता - शहरातील नागरीकांना पिण्यास स्वच्छ पाणी मिळावे याकरीता नविन पाणी पुरवठा योजना लवकर कार्यान्वित करावी  अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ यांच्या नेतृत्वाखाली राहाता न.पा. मुख्यधिकारी श्री.आहेर यांना देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल राहाता शहराध्यक्ष गुलशेरभाई शेख, युवक शहराध्यक्ष जाहिद दारूवाले, माजी नगरसेवक निवृत्ती गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई शहा,अन्सारभाई पठाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले आहे की, वास्तविक पाहता राहाता शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी योजना मंजूर होऊन सुमारे ८०% पेक्षा अधिक कामे झालेले असून सदर योजना ही मागील सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ नियोजन शून्य कारभारामुळे सदर पाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून रखडत पडलेली आहे. सदर योजना पूर्ण करण्याची त्यांची मानसिकताच नसल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजून महागडे पाणी विकत घेणे भाग पडत आहे, अशी दुर्दैवी वेळ मागील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्त्यापणामुळे आलेली असून त्यांच्या तुघलकी कारभारामुळे सदरचे पाणी योजना कुचकामी ठरलेली आहे.

तसेच राहाता शहराला होणारा पाणीपुरवठा व शहराची वाढती पाणी मागणी लक्षात घेता सदर पाणी योजना कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे आहे. करीता सदरची पाणी योजना राहाता नगरपालिकेने लवकरात लवकर पूर्ण करून शहरातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व फिल्टर पाणी पुरवठा करून नागरिकांना या पाणी प्रश्नी समस्येतून मुक्त करावे अशी विनंतीवजा मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली. 

सोबतच मा.मुख्याधिकारी महोदयांनी शहरास चार दिवसाला मिळणारा पाणी पुरवठा दोन दिवसांवर केल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस राहता शहराच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
close