shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माती विभागातील सुवर्णपदक विजेता पैलवान अनिल कचरे यांचा रणसिंग महाविद्यालयात सन्मान

माती विभागातील सुवर्णपदक विजेता पैलवान अनिल कचरे यांचा रणसिंग महाविद्यालयात सन्मान
 फोटो - कळंब ता. इंदापूर येथे पैलवान अनिल कचरे यांचा सन्मान करताना संस्था सचिव विरसिंह रणसिंग.

   इंदापूर प्रतिनिधी:  इंदापूर तालुका ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील  विद्यार्थी पैलवान अनिल कोंडीबा कचरे ( तृतीय वर्ष कला शाखा ) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ७० किलो माती विभागात सुवर्णपदक मिळविले. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते पैलवान कचरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रणसिंग म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता सोबत कला व क्रिडा प्रकारात सहभागी होऊन यश मिळवत आहेत.संस्था व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात प्रयत्नशील आहेत.पैलवान कचरे यांनी कुस्तीमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे संपूर्ण राज्यात महाविद्यालयाचा नावलौकिक झाला.यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर संस्था व महाविद्यालयाची नेहमीच कौतुकाची थाप पडत असल्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट , प्रा. प्रशांत शिंदे , प्रा.डॉ. विजय केसकर ,प्रा .डॉ रामचंद्र पाखरे ,प्राध्यापक ज्ञानेश्वर गुळीग , प्राध्यापक राजेंद्र कुमार डांगे ,प्राध्यापक जोत्सना  गायकवाड, प्राध्यापक विनायक शिंदे , कला ,वाणिज्य व  विज्ञान शाखेचे प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



close