shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उशीरा येणाऱ्या शिक्षकांचे आता खुपच झाले ! त्रस्त ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला ठोकले टाळे !!

नेहमीच शिक्षक उशीराने येतात म्हणून संतप्त खोकर ग्रामस्थांनी जिल्हा परीषद शाळेच्या गेटला ठोकले टाळे

भोकर । प्रतिनिधी :-
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे काही शिक्षक नेहमीच शाळेत उशीराने येतात व चौकशी केली असता संयुक्तीक कारण न देता आरेरावीची भाषा वापरतात, त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी जिल्हा परीषद शाळेच्या गेटला टाळे ठोकत संबधीत शिक्षकांना निलंबीत कण्याची मागणी निवेदनाद्वारे गट शिक्षणाधिकारी यांचेकडे केली आहे.
खोकर येथील जिल्हा परीषद शाळेत असलेल्या पाच शिक्षकांपैकी तीन शिक्षक नेहमी शाळेत उशीराने येतात. उशीराने येवूनही संयुक्तीक कारण न देता आरे रावीची भाषा वापरत होते. हे शिक्षक कायमच उशीराने येतात म्हणून संयमाची सिमा संपल्याने येथील सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यावस्थापन समीतीचे अध्यक्ष यांनी एकत्र येवून शाळेच्या गेटला टाळे ठोकत संबधीत शिक्षक निलंबीत होई पर्यंत कुलूप तसेच ठेवण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर सरपंच आशाबाई चक्रनारायण,उपसरपंच दिपक काळे, पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पवार, राजू चक्रनारायण, राजू सलालकर व रावसाहेब चक्रनारायण आदिंच्या सह्या आहेत.


close