श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघातर्फे शिवजयंतीदिनी घेण्यात येत असलेल्या पत्रकार अधिवेशन कार्यक्रमानिमित्तप श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने घेतली आमदार समीर कुणावार यांची भेट
हिंगणघाट (जि.वर्धा) :
श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघातर्फे दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर घेण्यात येत असलेला पत्रकारांचा मेळावा आणि सा.स्वतंत्र विदर्भ की ताकद वर्तमानपत्रचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमानिमित्त श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने हिंगणघाट विधानसभेचे लोकप्रिय आमदार समीर कुणावार यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध समस्या आणि आडचणी सोबतच फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या भव्य पत्रकार मेळाव्याबाबत श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष इसत्याक शेख यांच्यासह संघाचे पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार समीरभाऊ कुणावार म्हणाले की,श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघ, पत्रकारांचे मनोबल वाढविण्यात नेहमी अग्रेसर असते,केवळ पत्रकारांच्या समस्याच नसुन जनसामान्यांच्या समस्यांप्रसंगी सातत्याने आवाज उठवते, यामुळे जनसामान्यांच्या जटील प्रश्नांवर प्रकाश पडून संबंधित प्रशासन देखील त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करते आणि समस्यांचे योग्य निराकरण होते,तसेच श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाच्या अशा कार्यक्रमांमुळे पत्रकारांचे मनोबल वाढेल, त्यामुळे भविष्यात असे कार्यक्रम व्हायला हवेत.अशा चांगल्या आणि सामाजाभिमूख कार्यांना आमचे नेहमीच सहकार्य असते श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगत पत्रकार संघाच्या मेळाव्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.यावेळी पत्रकार संघाचे विशाल माथनकर, तौसीफ़ अली, हेमा काढ़े, पोर्णिमा मस्के, राहिल अली, मोहम्मद इसत्याकी, वसीम शेख, ईरशाद शेख़, इरफान पठाण,आदि उपस्थित होते.
या मेळाव्यात पत्रकारांसमवेत विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, आदि क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रतिष्ठित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असुन स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख देखील या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे श्रमजीवी ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष इस्त्याक शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

