shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत भरला आनंदी बाजार.

बांडेवाडी शाळेत भरला आनंदी बाजार..

पालकांनी लुटला खेदीचा आनंद.

इंदापूर प्रतिनिधी:दि ७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे मुलांना व्यवहारज्ञान कळावे व स्वतःच्या शेतातील भाजीपाला कसा विकावा या हेतूने आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजाराचे उद्घाटन पळसदेव ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास भोसले व सदस्य भालचंद्र बांडे यांचे हस्ते करण्यात आले. 
           बाजारात विकण्यासाठी मुलांनी वांगे , टोमॅटो , कारले , भेंडी , कांदे , बटाटा , कोथिंबीर , मेथी , पेरू ,घेवडा , शेवगा अशा सर्व प्रकारची भाजीपाला उपलब्ध होता. त्याचप्रमाणे शालेय स्टेशनरी साहित्य , वडापावचे स्टाल मुलांनी लावले होते. महिला पालक , ग्रामस्थ यांनी खरेदीसाठी गर्दी केली. यावेळी बाजारात एकूण पाच हजार रुपयापर्यंत उलाढाल झाली‌.
     
          यावेळी यावेळी पत्रकार रामदास पवार , राजू मुलाणी , पांडुरंग वागजकर , सचिन बांडे , शरद पवार , आण्णा बांडे , गंगाराम बांडे , शिक्षक सोसा संचालक भारत बांडे , उन्मेष कुचेकर , संजय जाधव , देवीदास वाघमोडे , पालक , महिला उपस्थित होते. बाजाराचे नियोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे , ललिता वाघमोडे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोदकुले , उर्मिला बांडे यांनी केले.
close