shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरोगी शरीरासाठी नियमित योग करण्याची गरज - माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

निरोगी शरीरासाठी नियमित योग करण्याची गरज - माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे 

इंदापुर प्रतिनिधी: इंदापूर मध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पतंजली योग समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या योग शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भारत स्वाभिमानी न्यास समितीचे अध्यक्ष जयकुमार शिंदे पतंजली योग समितीचे इंदापूरचे अध्यक्ष मल्हारी घाडगे रवींद्र परबत बिबीशन खबाले प्रशांत गिड्डे सचिन पवार रामेश्वर साठे शरद झोळ उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की सांगितले की, पतंजली योग समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यातील नागरिकांना मोफत योग प्रशिक्षणाचे धडे देण्याचे काम पतंजली योग समिती करत आहेत. नियमित योगामुळे मनुष्याचे शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी नियमित योग करण्याचे आवाहन यांनी केले.
close