shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ठाकरे जी ..!

ठाकरे जी ..

बाळासाहेब  ठाकरे
व्यक्तित्व अलौकिक
मराठी मातीस लाभे
अनमोल हे  माणिक

मराठी माणसा  प्रती
असे विशेषजवळीक
बाॅंम्बेची  केली मुंबई
सुस्वभावीआगळीक

व्यंगचित्रा  वाहिलेले
साप्ताहिक  मार्मिक
वर्मावरती शरसंधान
प्रयोग हो अलौकिक

सामनापक्ष मुखपत्र
लढवैये सार्थ दैनिक
रक्षण करे समाजाचे
शब्दशस्त्रांचे सैनिक

कर्तृत्वाअन् वक्तृत्वा
छान जमे  सोयरिक
स्वप्नआणावे सत्यात
सुखी राहो नागरिक

हिंदू हृदय सम्राट हा
जग  जाणे  लौकिक
अयोध्या मंदीर झाले
तुष्ट कारसेवा श्रमिक

- हेमंत मुसरीफ पुणे 
  ९७३०३०६९९६
  www.kavyakusum.com

2)

नाव बाळासाहेब ..

बाळासाहेब  ठाकरे
व्यक्तीमत्व  ते न्यारे
उलट्या वाटे  जाता
दिसेल  दिवसा तारे

खणखण होई  वार
अरे म्हणताचं  कारे
ना अंगचटीला येऊ
दिधले सरळ  इशारे

बोले बिनधास्तबोल
पुराव्यांच्या  आधारे 
ऐकूनचं नाव ठाकरे
भला भलाही सुधारे

मराठीअस्मिताजागे
संपले  सगळे नखरे
मराठी माणसा तुला
कळे शक्तीरूप  खरे

निर्भय बनवले सर्वां
रेभगवा सन्माने धरे
दिल्लीतही  म-हाठी
नांव झळकते आदरे

भाव बंधना जाणूनि
इथे रहावे सौख्यभरे
ते हृदयसम्राटविचार
आता पदोपदी स्मरे

बाळासाहेब स्मारक
मनात एखादं उभारे
आचरण करता जरा
किर्ती जाईलं नभा रे

- हेमंत मुसरीफ पुणे 
  ९७३०३०६९९६
  www.kavyakusum.com

3)

बाळासाहेब..

बाळासाहेब  नावाने
उंचीअत्युच्च गाठली
जयकार कर जाणवे
अद्भुत उर्जा साठली

व्याघ्र  गर्जना ऐकता
भल्याची रे  गारठली
होई सभा भिडे नभा 
हवाक्षणात पालटली

आवाज खणखणीत
हौसकानाची फिटली
बोटे  ठेवता वर्मावरी
कित्येकांची  फाटली

सामनापत्र वाचताना
मशाल धडाडा पेटली
मराठी अस्मिता पुन्हा
मराठीमाणसा भेटली

मार्मिक कुंचला  फिरे
व्यंगचित्रे छान नटली
हात घाले काळजाले
पतंग कित्येक कटली

हिंदू  हृदय  सम्राटांची
स्मृती मनोमन दाटली
मराठी अस्मिता जाण
महती  अगाध  पटली

- हेमंत मुसरीफ पुणे 
  ९७३०३०६९९६
  www.kavyakusum.com

close