श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इंदापूरच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केले विविध गुणदर्शन कार्यक्रम..
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांत बसून लूठला स्नेहसंमेलनाचा आनंद.
इंदापूर प्रतिनिधी :शनिवार दि २१ जाने २०२३ रोजी श्री.नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इंदापूर येथे स्नेह संमेलन निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले संपूर्ण कार्यक्रमास दोन हजारांहून जास्त प्रेक्षक हजर होते. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकप्रिय गीते, नृत्य, लावणी सादर करून सर्वाची मने जिंकली .हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून आनंद घेतला. श्रीपाद शिंदे मुलाला लावणी सादर केल्याबद्दल पाच हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले व संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहत आनंद घेतला .
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक पराग जाधव, नगरसेवक कैलास कदम, शेखर पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इंदापूरकर उपस्थित होते

