shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.कानडेंच्या प्रयत्नाने भोकर - मुठेवाडगांव रस्त्यासाठी २.९३ कोटीचा निधी मंजूर

दोन्ही गावातील नागरीकांत समाधान;आ.लहुजी कानडेंना दोन्ही गावच्या ग्रामस्थांकडून धन्यवाद ...!

भोकर । प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अनेक वर्षापासून मागणीकरूनही प्रलंबीत असलेल्या भोकर - मुठेवाडगांव रस्ता अखेर आमदार लहु कानडे यांनी विशेष प्रयत्न करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत बसवत त्यास २ कोटी ९३  लाखांचा निधी मंजूर करत भोकर व मुठेवाडगांव या दोन गावांना जोडणारा रस्ता आता केवळ मजबुतच नव्हे तर डांबरीकरण व रूंदीकरण होणार असल्याने या दोन्ही गावच्या ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे. त्याच बरोबर आमदार कानडे यांना दोन्ही गावांकडून धन्यवाद दिले जात आहे.

भोकर व मुठेवाडगांव हा दोन गावांना जोडला जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती व्हावी, येथे भोकर शिवारात पटारे व आबुज यांच्या शेतात असलेल्या नाल्यावर पुल व्हावा या करीता आतापर्यंत भोकर व मुठेवाडगांव या दोन गावच्या राजकीय पुढार्‍यांनी अनेकदा मागणी केली होती परंतू  या रस्त्यावर तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून केवळ मुरूमीकरण करून या ग्रामस्थांची बोळवण केली जायची. या रस्त्यावरील पुल अनेकदा बांधण्यात आला परंतू त्यावेळी या पुलाला उंची न दिल्या मुळे या नाल्याला आलेल्या पुरात अनेकदा या पुलाचे भराव वाहुन गेल्याने रस्ता बंद पडल्याचेे या दोन्ही गावांनी अनुभलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा रस्ता बंदच असायचा, त्यामुळे या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांची मोठी अडचण निर्माण व्हायची.अशा परिस्थीतीत श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहु कानडे यांनी या रस्त्यावर आपले लक्ष केंद्रीत करत शासनाकडे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता अमीत चोळके यांचेकडे पाठपुरावा करत या तीन कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर केल्याने आता भोकर व मुठेवाडगांव या दोन्ही गावांना जोडणारा हा रस्ता मजबुतीकरणाबरोबर, रूंदीकरण व डांबरीकरण होवून या नाल्यावरील पुलही भक्कम होवून या भागातील शेतकर्‍यांचा व नागरीकांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री ग्रासडक योजनेचे अहमदनगर येथील अभियंता अमित चोळके यांनी नुकतीच या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. त्यावेळी त्यांचे समवेत आमदार लहु कानडे यांचे बंधु माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकूटे,काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, जगदंबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक व बांधकाम कामगारांचे नेते गणेश छल्लारे, अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे, मच्छींद्र पटारे, भोकरचे सरपंच दत्तात्रय आहेर, मुठेवाडगांवचे सरपंच सागर मुठे, समाधान विधाटे, निखील कांबळे, सचीन पोखरकर,रामदास पवार, शामराव मुठे, सुरेश पवार, ठकसेन खंडागळे, काळू डूकरे, बाळासाहेब अमोलीक, सचीन विखे, बाळासाहेब वाकडे, पत्रकार हरीभाऊ बिडवे व चंद्रकांत झुरंगे आदि उपस्थित होते.

close