अजीजभाई शेख
राहाता - तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी महेंद्र काशिनाथ बेंद्रे वय ३२ वर्षे यांनी आपल्या राहते घरातील कौलाचे छत असलेल्या छतास लोखंडी बल्लीला नायलाँन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहेगाव येथे दिनांक २२/१/२०२३ रोजी पहाटे चार वाजेच्या पुर्वी घडली असून दहेगाव येथील शेतकरी जालींधर रामदास बेंद्रे यांच्या खबरीवरुन राहाता पोलीस स्टेशनचे अंमलदार पो.हे.काँस्टेबल तुपे यांनी दिनांक २२/१/२०२३ रोजी १०/३१ वाजता आकस्मिक मृत्यू.रजि.नं. ७/२०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे आमृ. रजि. दाखल करण्यात आले आहे.
तपासाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक श्री. इंगळे , पो.हे.कॉ.सुधाकर काळोखे यांनी घटनास्थळी भेट दिली.आत्महत्या करण्याचे कारण अद्यापपावेतो समजले नसल्याचे कळते. पुढील तपास राहाता पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुधाकर काळोखे करीत आहे.

